१४ मार्च १९८९ , पूर्वीय कॅनडा ,पहाटे २:४५ वाजता भर थंडी मध्ये अनपेक्षितपणे ६० लाख घरांमध्ये तब्बल ९ तासासाठी एका न दिसणाऱ्या वादळामुळे वीज गेली. वादळ?...हो बिन वाऱ्याच अदृश्य वादळ. हि काय भानगड आहे ...बिन वाऱ्याचा वादळ कधी असत का ? सौर वादळ
थोडं तपशिलात जाऊया..जसा साबणाचा फुगा डोळ्यासमोर फुटला कि हलकासा पाण्याचा शिडकाव होतो....हे असेच आगीचे बबल सूर्याच्या बाहेरच्या आवरणावर फुटत असतात. कधी लहान...कधी मोठे… आणि प्रभारित कणांचा शिडकावा करतात. फुटणाऱ्या फुग्याच्या आकारानुसार हा शिडकावा कधी पृथीपर्यंत पोहोचतो तर कधी नाही. सूर्याच्या बाह्यावरणाला कोरोना म्हणतात. त्यामुळे या शिड्काव्याला "कोरोनल मास इजेक्शन" असा हि म्हणतात. हा कोरोना उघड्या डोळ्याने पाहता येन कठीण ..म्हणून वैज्ञानिक संपूर्ण सूर्यग्रहणाला याचे अध्ययन करतात जेव्हा सूर्य पूर्ण झाकला जातो व फक्त बाह्यावरण दिसते. कोरोनो विषाणू चे नाव देखील याच कारणामुळे पडले आहे कारण त्याचे बाह्यावरण एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसते.
सूर्यापासून निघणारे हे प्रभारित कण ४५० किमी प्रति सेकंदाच्या प्रचंड वेगाने पृथ्वी च्या दिशेने कूच करतात आणि तीन चार दिवसात पोहोचतात . सूर्यसाठी जरी तो शिडकावा असला तरी पृथ्वी साठी ते वादळ आहे. तसे पृथ्वीचे स्वतःचे सरंक्षण कवच आहे, ते म्हणजे ति चुंबकीय क्षेत्र. हे क्षेत्र येणाऱ्या प्रभारित कणांना बऱ्याच प्रमाणात दूर ढकलते. फुटणाऱ्या फुग्याच्या आकारानुसार या कणांची तीव्रता कमी अधिक असल्याने संपूर्ण वादळ ढकलणे कधी कधी कठीण होते आणि १९६९ सारखें दुर्मिळ घटना घडतात कारण हे प्रभारित कण इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या कार्यात बाधा निर्माण करतात.
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे सूर्य कधी कशी एव्हढ्या जोरात शिंकतो कि पृथ्वी ची प्रतिकार शक्ती ती शिंक अडवू शकत नाही आणि ती आजारी पडते.जसे पृथ्वीवर तिच्या परिक्रमे मुळे ठराविक काळाने ऋतूबदल घडत असतात तसेच सूर्यावरती हि घडत असावेत असा शास्त्रज्ञाचा कयास आहे. जर का हे ऋतू बदल आपल्याला कळले कि सूर्य केव्हा उग्र असणे अपेक्षित आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येईल आणि योग्य ती खबरदारी घेता येईल.
पण आता अचानक सूर्याच्या या सर्दीची आपण जास्त धास्ती का घेतोय? मानव प्रगत झालाय, इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने आपली कामे जलद आणि सुकर करू लागलाय. अवकाशात फिरणाऱ्या शेकडो उपग्रहापासून ते आपल्या घरातील कॉम्पुटर या शिंकेने प्रभावित होऊ शकतात आणि संवांदांशील माहिती ला धोका निर्माण होऊ शकतो आणि जनजीवन ठप्प होऊ शकते जर का सूर्य पुन्हा जोराने शिंकला तर. सूर्यासमोर पृथ्वी आकाराने खूपच क्षुद्र असल्याने आपण त्याची सर्दी तर थांबवू शकत नाही, पण स्वतःला सुसज्ज ठेवण्याचा प्रयत्त्न तंत्रज्ञानाच्या साहायाने करू शकतो.
अमेरिकेने ऑगस्ट २०१८ मध्ये पार्कर सोलर प्रोब नावाचा उपग्रह सूर्याभोवती परिक्रमा करायला पाठवला असून तो आता पृथ्वीवरती माहिती पाठवू लागला आहे. भारताने देखील अशीच एक आदित्य एल १ नावाची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे ज्यामध्ये सूर्याच्या बाह्यावरणाचे तापमानातील बदल, सौर वादळ, चुंबकीय क्षेत्र , किरणोत्सर्ग आणि अतिनील किरणांचा अभ्यास अश्या अनेक गोष्टींचा अभ्यास घेतला जाणार आहे. उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून मानव स्वतःला संभाव्य धोक्यापासून जागृत आणि सुसज्ज करायचा प्रयत्न करत राहिलंच पण तोपर्यंत सूर्याला परत सर्दी ना झालेलीच बरी…
©️ बंधु
No comments:
Post a Comment